Categories: Uncategorized

कुकशेतच्या ग्रामस्थांसाठी कुकशेतच्याच ढाण्या वाघाचे हर्डिलियाच्या प्रवेशद्वारावर १९ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू!

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : मागील एक दशकाहून अधिक कालावधीपासून नवी मुंबईच्या राजकारणात सुरज बाळाराम पाटील या युवकाला कुकशेतच्या ढाण्या वाघ या नावाने संबोधले जात आहे. सतत कुकशेतच्या विकासाच्या ध्यास घेवून एमआयडीसी, नवी महापालिका, मंत्रालय आदी प्रशासन दरबारी सातत्याने धडका देणाऱ्या सुरज बाळाराम पाटील या युवकाने पुन्हा एकवार कुकशेतच्या ग्रामस्थांच्या न्याय्य हक्कासाठी हर्डिलिया कंपनीच्या प्रवेशद्वारावर शिवजयंतीपासून १९ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. उपोषणाचा तिसरा दिवस संपत आला तरी कुकशेतच्या ग्रामस्थांना न्याय  मिळवून दिल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करत सुरज पाटील यांनी कुकशेत गावाशिवाय व कुकशेतच्या ग्रामस्थांशिवाय आपल्याला आपल्या जीवाची पर्वा नाही हे कृतीतून दाखविण्यास सुरूवात केल्याने ‘कुकशेतचा ढाण्या वाघ’ ही उपाधी  सार्थ ठरविली आहे.

  • कुकशेत गावातील ग्रामस्थांनी एमआयडीसीला शेतजमिनी दिल्या आणि त्या मोबदल्यात ज्या ग्रामस्थांना नोकरीत समाविष्ट करण्यात आले. आज ते सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांच्या वारसास (घरातील व्यक्तिस) नोकरीत समाविष्ट करून घ्यावे. २)  संदीप हेमंत पाटील या युवकाला दिलेल्या लेखी आश्वासनाची त्वरित पूर्तता करण्यात यावी. ३) ज्या ग्रामस्थांची अजून ट्रेनी म्हणून वेळ वाढवून ठेवली आहे, त्यांना त्वरित कायम स्वरूपी कामगार म्हणून  रूजू करून घ्यावेत. ४) मंदिर व इतर पुर्नवसित गावातील विषयांमध्ये कंपनीने स्वत:ची जबाबदारी स्विकारावी. ५) कुकशेत गावाच्या संपादित जमिनीवर कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पात कुकशेतच्या ग्रामस्थांनाच नोकरीमध्ये समाविष्ट करण्याचा लेखी करारनामा करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी सुरज पाटील यांनी शुक्रवारपासून  , दि.  १९ फेब्रुवारीपासून हर्डिलिया कंपनीच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांच्यासह नवी मुंबईतील अन्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी, माजी नगरसेवकांनी , विविध पक्षाच्या  पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देत  सुरज पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system