Categories: Uncategorized

कामगारांकडून कामगार दिनीच नवी मुंबई महापालिकेचा निषेध

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : १ मे सर्वत्र कामगार दिवस म्हणून साजरा केला जात असल्याने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाकडे व असुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कामगारांनी काळ्या फिती लावून काम करत महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.

नवी मुंबई महापालिकेत सर्वच विभागात अत्यावश्यक सेवा कंत्राटी कामगारांमार्फत पुरवल्या जात आहेत. सध्या नवी मुंबई महानगर पालिकेत दिवसागणिक कोरोना रुग्नाची वाढ होत आहे. अशा परिस्थिती सर्व कंत्राटी कामगार सर्व अत्यावश्यक सेवा विना तक्रार करदात्या नागरिकांना पुरवत आहेत.

केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाने कोरोना साठी लढणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवेत कार्यरत कामगारांना ५० लाखाचा विमा जाहीर केला आहे. या योजने अंतर्गत सर्व कामगारांची नोंदणी करून विम्याचे लाभ द्यावेत. ७ एप्रिल २०२० रोजी आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार सर्व कंत्राटी कामगारांना ३०० रुपये विशेष भत्ता लागू करावा. या कालावधीत स्वत:ची स्वछता राखणे महत्वाचे आहे. यासाठी सर्व कामगारांच्या  हजेरी शेडला पाण्याची व्यवस्था करावी. कामगारांना हात मौजे मास्क सॅनिटायझर मिळावे. उद्यान विभागातील कामगारांना दोन महिने वेतन मिळाले नाही ते त्वरित मिळावे. आरोग्य विभागातील कामगार कोरोना रुग्णाच्या संपर्कात असताना त्यांना पी पी इ किट मिळाव्यात. विष्णुदास भावे नाट्यगृहातील  कामगारांना सहा महिने वेतन मिळालेले नाही त्यांना त्वरित वेतन मिळावे, या मागण्यासाठी शुक्रवारी १ मे रोजी जागतिक कामगार दिनी नवी मुंबई महानगर पालिकेतील कामगारांनी काळ्या फिती लावून नवी मुंबई महापालिकेचा निषेध नोंदवला आहे.

महाराष्ट्रातील श्रीमंत महानगर पालिका असूनही कामगारांच्या बाबतीत मात्र उदासीन आहे. एका कायम कामगारावर होणाऱ्या खर्चापेक्षा जास्त खर्च कथित कंत्राटी कामगारावर करते. म्हणजेच या कथित कंत्राटी कामगारांना कायम केल्यास महापालिकेचा आर्थिक फायदाच होणार. फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी महानगर पालीका कंत्राटी पद्धत राबवत आहे. सध्या जे आस्मानी कोरोना संकट कोसळले आहे त्या संकटात ठराविक कायम अधिकारी ऑफिसला बसवून कागदी घोडे नाचवत असले तरी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांपैकी  बहुतांश कामगार हे तथाकथित कंत्राटी आणि ठोक पगारी कामगार आहेत. ठाणे महानगर पालिकेने सर्वच कामगारांचा विचार करून  पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज insurance scheme for health working fighting Covid 19 या विमा योजनेअंतर्गत सर्वच कामगारांची ( कायम, ठोक पगारी, कंत्राटी) नोंदणी सुरू केली आहे. परंतु नवी मुंबई महानगर पालिका कामगारांचा विमा काढण्यात पुढाकार घेत नसल्याविषयी कामगार नेते मंगेश लाड यांनी खेद व्यक्त केला आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago