Categories: Uncategorized

आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा, घनकचरा विभाग कर्मचारी-अधिकाऱ्यांची कोविड १९ चाचणी करून घेण्याची इंटकची मागणी

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा, घनकचरा विभाग कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोविड १९ चाचणी महापालिका प्रशासनाने मोफत करून घेण्याची मागणी नवी मुंबईचे इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

सध्या कोरोनाचा काळ आहे. नवी मुंबईकर घरात थांबून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत. पालिका प्रशासनाकडून कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नवी मुंबईकरांची सेवा करत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर, परिचारिका व आरोग्य विभागातील इतर कर्मचारी, बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी, घनकचरा विभागातील स्वच्छता निरीक्षक, उपस्वच्छता निरीक्षक, अन्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी, आशा लिंक वर्कस, सहाय्यक परिचारिका या सर्वाची पालिका प्रशासनाने  लवकरात लवकर कोविड १९ चाचणी करून  घ्यावी, जेणेकरून कोरोनाग्रस्तांवर उपचार करता करता कोणाला  लागण झाली आहे अथवा नाही ते स्पष्ट होईल, असे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

अत्यावश्यक सेवा बजावताना नवी मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनाही लागण झाली आहे अथवा नाही ते स्पष्ट  होईल. आज अत्यावश्यक सेवा बजविताना  हे सर्वच कर्मचारी आपलाच नाही तर आपल्या परिवाराचाही जीव नवी मुंबईकरांसाठी धोक्यात घालत असल्याने आपण समस्येचे गांभीर्य समजून घ्यावे. लवकरात लवकर पालिका प्रशासनाच्या वतीने या सर्वच कर्मचाऱ्यांची कोविड १९ चाचणी करून घेण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago