Categories: Uncategorized

अखेर तोडले आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळे

नवी मुंबई : कोरोना आटोक्यात येत असल्याने जनजीवन सुरळीत होवू  लागले आहे. खासगी विवाह हॉल, समाजमंदिर सुरू झालेले असतानाही नेरूळमधील  सिडकोचे आगरी-कोळी सांस्कृतिक भवन मात्र विवाहासाठी सुरू झालेले  नाही.  त्यामुळे नवी मुंबईतील आगरी-कोळी ग्रामस्थांना विवाहासाठी भरमसाठ भाडे देवून खासगी हॉल भाड्याने घ्यावे लागत होते. सिडको व  राज्य सरकारला  वारंवार कळवूनही स्थानिक आगरी-कोळी ग्रामस्थांच्या मागणीकडे व  समस्येकडे कानाडोळा होत असल्याने सारसोळे गावच्या मनोज मेहेर या  युवकाने संतप्त होवून गुरूवारी सकाळी आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळेच तोडले.  नवी मुंबईच्या ग्रामस्थांकडून मनोज मेहेरच्या कृतीचे स्वागत केले जात असून अन्य ग्रामस्थ नेत्यांवर टीकेचे तोंडसुख घेतले जात आहे.

नवी मुंबई कार्यक्षेत्रात सर्व व्यवहार आता समाजमंदिर, हॉलमध्ये केले जात आहे. वाढदिवस, विवाह, साखरपुडे खासगी हॉलमध्ये सुरू आहेत. खासगी हॉल सुरू असतानाही नेरूळ सेक्टर २४ मधील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन मात्र आजही बंद आहे. हे सांस्कृतिक भवन नवी मुंबईतील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन आजही बंद  आहे. हे सांस्कृतिक भवन बंद असल्याने स्थानिक आगरी-कोळी समाजाला विवाह व अन्य कार्यक्रमासाठी खासगी हॉल भरमसाठ भाडे देवून घ्यावे लागत आहे. यामध्ये ग्रामस्थांची आर्थिक  पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यावर आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू करण्यात यावे यासाठी सारसोळे गावच्या मनोज मेहेर यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यत सर्वाकडे लेखी पाठपुरावा करत समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न  केला. तथापि या पाठपुराव्याकडेही कानाडोळा होत असल्याचे पाहून १० फेब्रुवारीपर्यत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन सुरू न केल्यास ११ फेब्रुवारीला आगरी-कोळी भवनचे टाळे तोडणार असल्याचा इशारा मनोज मेहेर यांनी सिडकोसह राज्य सरकारला दिला होता.

गुरूवारी सकाळी मनोज मेहेर यांनी आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळे तोडले. आतमध्ये जावून त्यांनी भवनची पाहणी केली. या भवनात लवकरात  लवकर ग्रामस्थांचे विवाह सुरू करण्याची मागणी यावेळी मनोज मेहेर यांनी यावेळी केली. कोणा आगरी-कोळी समाजबांधवांना येथे विवाह करावयाचा असल्यास त्यांनी आपल्याला संपर्क करावा, आपण स्वखर्चाने आगरी-कोळी सांस्कृतिक भवनची सफाई करून देवू असे मनोज मेहेर यांनी यावेळी सांगितले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago