Support JaalglyaBharat.
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर१० मधील षटकार सोसायटी बिल्डींग क्रं १ ते १२ मध्ये सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत आणि माजी हॅट्ट्रीकवीर नगरसेविका सौ. इंदुमती नामदेव भगत यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष कांताराम ताम्हाणे, उपाध्यक्ष अनिल तळेकर, उपसचिव अर्जुन चव्हाण, खजिनदार आनंदा पाटील, रोहिदास गव्हाणे तसेच असोसिएशनचे सभासद मारुती खाटपे, तुकाराम पांगुळ, प्रकाश चव्हाण, गणपत दाते, पोपट घोरपडे, सुखदेव आहेर, दत्तात्रय शिरसागर, परमेश्वर माळी, संतोष तिकोने, ज्येष्ठ नागरिक तानाजी जाधव, हरिश्चद्र गव्हाणे, दिलीप हिंगे, चिंचोले, समाजसेवक किशोर पाटील, शाखाप्रमुख विशाल ताम्हाणे, उपशाखाप्रमुख उमेश गव्हाणे विजय पवार उपस्थित होते.