Support JaalglyaBharat.
नवी मुंबई : शिवसेना शाखा क्रं. ८७च्या वतीने प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदानात सहभाग नोंदविला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, धर्मवीर आनंद दिघे जयंती व प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसेना शाखा ८७ कडून २६ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हे रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. शिवसेना विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे व ज्येष्ठ नागरिकांनी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरात शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे आणि युवा सेनेचे उपशहर अधिकारी निखिल रतन मांडवे यांनीही रक्तदान केले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी स्थानिक शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, महिला पदाधिकारी शलाका पांजरी, शुभांगी परब, सुनंदा शेलार, मंगेश शिवतरकर, विशाल गुंजाळ, अनुभव बेळे, जयश्री बेळे, सचिन महाडीक, अतुल ठाकूर, सुनिल सानप, अमर जाधव, प्रतिक वाघमारे, संजय घोडेकर व स्थानिक शिवसैनिकांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व युवा सैनिकांनी परिश्रम घेतले.