Support JaalglyaBharat.
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नवी मुंबई : सालाबादप्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टी नेरुळ -९६/९७ च्या वतीने आणि जनसेवक गणेशदादा भगत, स्थानिक नगरसेविका रुपाली किस्मत भगत, तालुकाध्यक्ष राजू तिकोने, समाजसेविका उल्का राजू तिकोने यांच्या सौजन्याने महाशिवरात्रीनिम्मित सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत शिवभक्तांना नेरुळ सेक्टर-१८ ए येथील शिवमंदिराजवळ अल्पोपहार,फळे आणि पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिव मंदिरात दर्शन करून आलेल्या शिवभक्तांनी अल्पोपहाराचा आणि पाणी वाटपाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
कार्यक्रमाला नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, नगरसेवक अशोकशेठ गावडे, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेविका श्रद्धा गवस, प्रदीप गवस, माजी नगरसेवक रमेश शिंदे, मकरंद म्हात्रे, बाबू तळेकर यांनी सदिच्छा भेट देऊन नागरिकांना अल्पोपहार आणि पाण्याचे वाटप केले.
कार्यक्रम स्थळी अल्पोपहार,फळे आणि पाणी वाटप करण्यासाठी समाजसेवक संजय पाथरे, भोजमल पाटील, संजय सपकाळ, आनंदराव पवार, बी.जी.कुंभार, शांताराम कुऱ्हाडे, राजेंद्र धनावडे, रमेश नरवडे, अनंत कदम, गोरक्षनाथ गांडाळ, शिवाजीराव पिंगळे, दादासाहेब लोंढे, दादासाहेब पवार, मोरे सर, आसाराम शिंदे, घोरपडे सर, अंकुश माने, आर.एम. पाटील, आर.जी.मराठे, विवेक पाटील, अशोक हाडवळे, गणेश नागरगोजे, सागर मोहिते, सूर्या पात्रा, श्रीधर मोरे, राजेश घाडी, अशोक गांडाळ, सौरव सावंत, गौरव सूर्यवंशी, गौरव सावंत, चंद्रकांत महाजन, विशाल पाटील, मंगेश कदम, सत्यवान घाडी, सुभाष यादव, दीपक खरटमळ, बाजीराव धुमाळ, संजय पिंगळे, संतोष पाटील, किरण गायकवाड, सुरेश ठाकूर, दीपक जाधव, तानाजी कचरे, रामकृष्ण नार्वेकर, समाधान कांबळे, मंगेश काटकर, भाऊसाहेब गटकळ, संतोष बारवे, अमित पवार, रजनी धनावडे, कल्पना पाटील, छाया चव्हाण, सुनीता कारंडे, किरण पिंगळे, सुरेखा पिंगळे, विजयालक्ष्मी महाजन, संजीवनी भोर, रश्मी सावंत, सुरेखा देठे, आशा सकपाळ, वर्षा देठे, राणी कासुरडे, सुजित मोरे, अतुल देठे, तुषार जगताप, स्वप्नील दौड, ओम सागर तिवारी, विशाल खंदारे, अजित सरगर, संतोष नागरगोजे, सचिन ढसाळ, रविंद्र भगत यांनी विशेष मेहनत घेतली.