अनेक proprietary firms वा partnership firms शून्यातून कारभार सुरू करतात. कंपनी अगदीच लहान असेल अन तो व्यवसाय करणारे पहिल्यांदा बिझनेस करत असतील, तर छोटी-छोटी कामेही स्वतःलाच पार पाडावी लागतात. म्हणजे ऑफिस उघडणे, झाडू मारणे, लादी पुसणे, बँकेत पैसे deposit करणे, stationary आणणे, Electricity bill, water bill, society maintenance bill भरणे, गाडी चालवणे, गाडीत पेट्रोल भरणे, गाडी दुरुस्त करणे, product packing, product delivery, Documentation Delivery इत्यादी इत्यादी. ह्या कामांची यादी हनुमानाच्या शेपटासारखी लांबत जाते.
अन मग Entrepreneur चे जे महत्वाचे काम असते, म्हणजे Product Design, Product Order, Market Research अँड Development करणे, सेवा क्षेत्रात असाल तर नवनवीन सेवांचा अभ्यास करणे, त्या ग्राहकांना कशा देता येईल याचा अभ्यास करणे, त्याचे मार्केट शोधून काढणे, त्याचा मार्केटिंग plan बनवणे, मग Product मार्केटिंग करणे अन Sales मिळवणे, ही महत्वाची अन थेट Revenue Generate करणारी कामे करायला कमी वेळ मिळतो.
जर आपण बिझनेसमध्ये अगदीच नवखे असाल तर Delegation of Work ह्या संकल्पनेबद्दलही अनभिज्ञ असण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा मग आपण ऑफिसमध्ये झाडू मारणे, लादी पुसणे, बँकेत जाणे इत्यादी इत्यादी कामे करू लागतो अन आपला बराचसा वेळ अशा कामांमध्ये जातो, जे काम सहज दुसऱ्या व्यक्तीला करता येईल. मात्र त्यात Rocket Science वगैरे काही नसूनही हे काम करण्यात आपण व्यस्त होऊन जातो. वर नमूद केलेली सारी कामे करायला तुम्हाला एखादा ऑफिस बॉय पुरेसा असतो. ती कामे जर तो करू लागला तर तुमचा पुष्कळ वेळ ज्या कामात तुमची अधिक गरज आहे, त्या कामांना देता येईल अन आपला बिझनेस वाढवता येईल.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.