Support JaalglyaBharat.
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimuabailive.com@gmail.com
नवी मुंबई : मा. खासदार दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले गेले पाहिजे, या शिवाय इतर कोणाचेही नाव या विमानतळाला देऊ नये अशी येथील प्रकल्पग्रस्तांची भावना आहे याचा केंद्र सरकारने विचार करून त्या संदर्भातील निर्णय घ्यायला हवा. कारण या ठिकाणी गोर- गरीब जनतेसाठी शिक्षणाची गंगा पाटील साहेबांनी आणली आहे. अनेक रोजगार या ठिकाणी आणले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणचा तरुण कुठेही बेघर होणार नाही त्या साठी अनेक संघर्ष साहेबांनी सिडको, जेएनपीटीसोबत केले आहेत. येथील प्रकल्पग्रस्तांना खऱ्या अर्थाने लढायला शिकवले आहे. कारण आपण लढलो नाही तर आपल्याला काहीच मिळणार नाही, म्हणून येथील तरुण त्यांनी शिक्षित केला. आज आपल्या समाजात जी आर्थिक भरभराटी आली आहे. ती केवळ आणि केवळ दि.बा पाटील साहेब यांच्याच प्रयत्नांनी आली आहे आणि म्हणून येथील भूमिपुत्रांची ही आग्रहाची मागणी आहे की, लोकनेते दि. बा पाटील साहेब यांचेच नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे व सरकारने ही येथील स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार करून त्या संदर्भात निर्णय घ्यावा आणि येथील जनतेला व प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, असे रोखठोक प्रतिपादन कामगार नेते आणि राष्ट्रीय इंटकचे सचिव महेंद्र घरत यांनी जासई येथील दि. बा. पाटीलसाहेबांच्या जयंती निमित्त आदरांजली सभेत बोलतांना केले.