Support JaalglyaBharat.
नवी मुंबई : महानगरपालिका प्रभाग ८५ मधील नेरूळ सेक्टर सहा परिसरातील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणातील जंगली गवत तातडीने काढून टाकण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सुश्रुषा रूग्णालयानजिक सिडको सोसायटी परिसरात महानगरपालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. गेल्या काही महिन्यापासून कोरोना काळात या क्रिडांगणाची सफाई केली जात नाही. या क्रिडांगणाला पूर्णपणे बकालपणा आलेला आहे. या क्रिडांगणात जंगली गवत सर्वत्र वाढले आहे. या गवतामध्ये स्थानिक रहीवाशांना साप, नागाचेही मागील काही दिवसापूर्वी दर्शन झालेला आहे. एकतर या जंगली गवतामुळे क्रिडांगणाला आलेला बकालपणा व साप-नागाचे दर्शन यामुळे समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल, असे महादेव पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
या जंगली गवतामुळे डासांची घनता वाढीस लागली आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. नेरूळ सिव्ह्यू, वरूणा, एव्हरग्रीन या सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांना मोठ्या प्रमाणावर डासांचा त्रास सहन करत असल्याच्या तक्रारी तेथील रहीवाशांनी माझ्याकडे दिल्या आहेत. यामुळे स्थानिक रहीवाशांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागण्याची भीती आहे. साथीच्या आजाराचा उद्र्रेक होण्यापूर्वीच तसेच कोणाला साप-नाग दंश होण्यापूर्वीच या क्रिडांगणाची सफाई युध्दपातळीवर होणे आवश्यक आहे. लॉकडाऊन व कोरोनामुळे उद्यान व क्रिडांगण बंदच आहेत. त्यामुळे सफाई करताना कोणाचाही अडथळा येणार नाही. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना क्रिडांगणाच्या सफाईबाबत तातडीने आदेश द्यावे अशी मागणी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.