Support JaalglyaBharat.
स्वयंम न्यूज ब्युरो : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सारसोळे गावातील नागरिक मधुकर तांडेल यांना कोरोना आजार झाल्याने त्यांना सिवूडस येथील न्यूरोजन रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र अंतिमतः त्यांच्या उपचारांवर खर्च करण्यात आलेल्या बिलांमध्ये तफावत दिसून येत असून त्यांच्या वैद्यकीय उपचार देयकाचे पालिकेने ऑडिट करावे व संबंधितांच्या नातेवाईकांना न्याय द्यावा अशी मागणी सारसोळे गावचे विकासपर्व व महापालिकेतील माजी ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
मधुकर तांडेल यांना ११ सप्टेंबर २०२० रोजी कोरोना आजारावर उपचारासाठी न्यूरोजन या रूग्णालयात दाखल करण्यात आले व याच रूग्णालयात १ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांचे निधन झाले. यादरम्यान त्यांचे हॉस्पिटल खर्च ८ लाख ३ हजार १५० रूपये झाला आहे. कदाचित हा आकडा वाढू शकेल. कै. मधुकर तांडेल यांच्या परिवाराने ५ लाख ३७ हजार १५० रूपयांचा भरणा केला आहे. २ लाख ६६ हजार देणे बाकी आहे. या देयकामध्ये तब्बल ३ लाख ३४ हजार रूपये मेडिसीन, १ लाख ३५ हजार ९०० रूपये व लॅब ६७२५० चे देयक मिळून ५ लाख ३७ हजार १५० रूपयांचा भरणा केलेला आहे. संबंधित रूग्णाचा सिटी स्कॅन व काही केले नसताना लॅबचे देयक समाविष्ट करण्यात आले असून यात गौडबंगाल दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या उपचार देयकाचे ऑडिट करण्यात यावे. वापरलेली मेडिसीन त्याच दर्जाची व गुणवत्तेची महागडी असताना तीच गुणवत्ता व दर्जा अन्य मेडिसीनमध्येही असताना महागड्या मेडिसीनचा आग्रह कशासाठी? असा प्रश्न मनोज मेहेर यांनी उपस्थित केला आहे.
संबंधित मयत रूग्ण गरीब असताना अव्वाच्या सव्वा लूटमार करण्यात आली असून पालिकेने रूग्णाच्या वैद्यकीय उपचार देयकाची चौकशी करावी अशी मागणी मेहेर यांनी केली आहे.