Support JaalglyaBharat.
भास्कर गायकवाड
नवी मुंबई : पावसाळा सुरू होताच प्रभागाप्रभागामध्ये वृक्षछाटणी करण्याची मागणी होवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडे असलेले कमी मनुष्यबळ व प्रभागाप्रभागात असलेली धोकादायक झाडांची संख्या पाहता नेरूळ सेक्टर दोनमध्ये झाडांची पडझड होवून जिवित अथवा वित्त हानी होवू नये यासाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी परिसरातील वृक्षछाटणी स्वखर्चाने करून घेतल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
नेरूळ सेक्टर २ परिसरात एलआयजी नोडमधील वारणा सोसायटीत वृक्षांची पडझड होवून घराची हानी झाली होती. या पार्श्वभूमीवर पावसाळा कालावधीत सोसाट्याचा वारा व संततधार पाऊस पडल्यास वृक्षांची पडझड होवून अधिक हानी होवू नये यासाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस प्रवक्ते आणि नेरूळ तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार परिसरातील वृक्षांची स्वखर्चाने छाटणी करण्याचा, धोकादायक फांद्या तोडण्याचा निर्णय घेतला व निर्णयाची अंमलबजावणीही तात्काळ केली.
नेरुळ सेक्टर २ एल आयजी मधील काही धोकादायक झाडांची छाटणी करून घेतली. रवींद्र सावंत यांच्या मर्गदर्शनाखाली स्व खर्चाने श्रीमती विद्या अरुण भांडेकर (सचिव-नवि मुंबई जिल्हा काँग्रेस) यांनी सोबत शेवंता मोरे (सह सचिव नवी मुंबई जिल्हा काँग्रेस),भजनी मंडळाच्या प्रमुख व जेष्ठ समाजसेविका रेश्मा लोकेगावकर (काकी) यांच्या मार्गदर्शनाने व स्वाती रेंके, मीनाकक्षी माने, नंदा वाघचौरे, महिलांच्या सहकार्याने व नारायण शिंदे , राजू लोकेगावकर यांच्या उपस्थितीत परिसरातील महत्वाची धोकादायक झाडांची छाटणी करून घेतली. स्थानिक रहीवाशांनी रवींद्र सावंत, विद्या भांडेकर यांनी स्वखर्चातून झाडांच्या धोकादायक फांद्याची छाटणी केल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.